लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, देशात 7 तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान
नवी दिल्ली,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी पार पडेल. देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (ता. 16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तर आता या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यांत म्हणजेच 20 मे 2024 ला मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 16 जून 2024 ला भारताच्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात असे होईल मतदान…
पहिला टप्पा (19 एप्रिल 2024) :
नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर
दुसरा टप्पा (26 एप्रिल 2024) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी
तिसरा टप्पा (07 मे 2024) :
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा (13 मे 2024) :
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा (20 मे 2024)
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण
543 लोकसभा जागांसाठी मतदान
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल : नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड,
दुसरा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल –
तिसरा टप्पा 7 मे मतदान –
चौथा टप्पा 13 मे मतदान —
पाचवा टप्पा 20 मे मतदान –
निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
भारतीय निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असते. यावर्षी जगभरात सर्वत्र निवडणुकांचे पर्व सुरू आहे. देशात एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.दे शात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख , 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, 18 ते 21 वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
पैसे वाटताना सापडल्यास काय करायचं?
कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
हिंसा टाळण्याचा निर्धार
निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. तिथे एकूण पाच feed येतील. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन आता वाटेल तशा घोषणा करता येणार नाही. घोषणा करताना खर्च आणि आर्थिक तरतूद दाखवणारे राजकीय पक्षांना प्रतिवेदन सादर करावे लागेल.
कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट
निवडणूक आयोगाने नुकतेच निवडणुकीत कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन दुप्पट केले आहे.
17 व्या वर्षी मतदार होण्यासाठी अर्ज करता येणार
17 व्या वर्षी मतदार होण्यासाठी फॉर्म -6 भरून ठेवण्याची सुविधा आयोगाने केली. 18 व्या वर्षी लगेच मतदान करता येणार.
EVM, VVPAT, CU मशीन ची ने – आण करण्यासाठी शॉक पृफ, वॉटर प्रूफ बॅग्स
2019 मध्ये निवडणुका कशा झाल्या होत्या?
मागील निवडणुकीत अर्थात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका या 7 टप्प्यात झाल्या होत्या. देशात त्यावेळी 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या दरम्यान मतदान झालं होतं. त्या मतदानातून देशातील 543 खासदारांची निवड झाली होती. मागील निवडणुकीत 78 महिला खासदार निवडून आल्या होत्या.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा
महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेवर निवडून जातात. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या. आता पाच वर्षात राज्यासह देशातील अनेक पक्षांची, युती-आघाडींची फाटाफूट झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटून नव्याने युती झाली. या युतीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत आता अजित पवार यांची राष्ट्रवादीही सोबत आहे.