ना वाफ घ्यायचीय, ना कोणती व्हिटॅमिनची गोळी; केंद्राकडून नव्या कोरोना गाईडलाईन जारी
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या आधी कोरोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते, जी औषधे दिली जात होती ती हटविण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे आदी गोष्टी यामध्ये आहेत.
कोरोना रुग्णांना आधी या गोष्टी घेण्याचे सल्ले दिले जात होते. परंतू आता नव्या गाईडलाईननुसार कोरोना ग्रस्तांना हे न करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
नव्या गाईडलाईननुसार हे करायचे नाहीय…
वाफ घ्यायची नाहीय.
कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाहीय.
कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाहीय.
आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाहीय.
Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही.
ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.
ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. याता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.