भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

डॉ. रवींद्र भोळे यांना दिल्ली येथे हिंदु रत्न सन्मान

दिल्ली रोहिणी, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार, अपंग सेवक ,ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांना नुकतेच हिंदु रत्न पुरस्कार उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच यांच्या वतीने समर्पित भावनेने राष्ट्रहितासाठी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन व हिंदू रत्न उपाधी सन्मान कार्यक्रमाच्या आयोजन येथे करण्यात आले होते. ह्यावेळी विविध क्षेत्रात समर्पित भावनेने राष्ट्रहितासाठी कार्य केल्याबद्दल उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना महामंडलेश्वर स्वामी हितेशानंद महाराज यांचे हस्ते स्मृती चिन्ह हिंदू रत्न उपाधी सन्मानपत्र, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

दिल्ली रोहिणी येथील कृष्ण परिणामी मंदिर वृंदावन हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार सरावगी हे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये नरसिंह अग्रवाल राष्ट्रीय महामंत्री, राहुल गोयल राष्ट्रीय युवा महामंत्री,किरण सिंह स्वागताध्यक्ष्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले त्याचबरोबर हिंदू रत्न पुरस्कार उपाधी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय पातळीवरील हिंदू रत्न पुरस्कर्ते उपाधी मिळालेल्यांमध्ये डॉ.रवींद्र भोळे उरुळीकांचन पुणे, सौ किरण सिंग, श्री उमेश कुमार शर्मा, श्री नरसिंग अग्रवाल, श्री राहुल गोयल, श्री सतीश अग्रवाल, श्री सुरेंद्र अग्रवाल, मिस्टर नरेंद्र धाकड, मिस्टर नरेंद्र प्रकाश गोयल, संगीता शर्मा इत विजय कोचर, गोविंद सोनी ,रवींद्र वर्मा, सतीश चे कमल संदेश, देवराज लता, माणिकचंद आपटे ,माया चव्हाण ,चंपा जैन , सुगम जैन ,प्रवीण त्रिपाठी, व्ही शिकुटो शेमा ,अतुल वर्मा, डॉ. प्रेमसुख सुराणा, विकास यादव, राजेंद्र अग्रवाल, डॉ नीतू शर्मा राजेंद्र मोदी, गंगा बक्ष सिंग, अशोक मित्तल, मताज अष्ट यांनाही हिंदू रत्न पुरस्कार उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!