देशभरात गेल्या 24 तासांत 1,00,636 कोरोना रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत लक्षणीय घट
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। देशातील कोरोनाची दुसरी लाट आता वेगाने ओसरताना दिसत आहे. कारण रविवारी दिवसभरात देशात 1,00,636 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही निचांकी रुग्णंसख्या आहे. तर दुसरीकडे कोरोना मृतांची संख्याही घटताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात 2427 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ शिगेला असताना मृतांचा दैनंदिन आकडा हा 4500 पेक्षा जास्त होता. मात्र, आता हे प्रमाण तीन हजाराच्याखाली येणे, अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
आतापर्यंत देशातल्या तीन लाख 49 हजार 186 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला मृत्युदर आता 1.21 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 93.94 टक्के झाला आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,00,636
देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,74,399
देशात 24 तासात मृत्यू – 2427
एकूण रूग्ण – 2,89,09,975
एकूण डिस्चार्ज –2,71,59,180
एकूण मृत्यू – 3,49,186
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 14,01,609
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 23,27,86,482
देशातील 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
देशातील 23 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 13 लाख 90 हजार 916 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी 13 लाख 11 हजार 161 नागरिकांनी पहिला तर 79 हजार 755 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 वर पोहोचली आहे.