मतदारसंघ निवडा, तुमच्या विरोधात उभी राहणार जिंकुन दाखवा– नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने माझ्यावर अत्याचार केला आहे. तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला. तुम्हाला आव्हान देते लोकांमध्ये येऊन निवडणूक लढून निवडून दाखवाच. महाराष्ट्रात कोणताही जिल्हा निवडा. तुमच्या विरोधात मी उभी राहते. तुमच्यात दम असेल तर निवडून दाखवा. पूर्वजांच्या पुण्याईने तुम्ही निवडून आला आहात. आता महिला ताकद काय असते हे दाखवून देईल. दोन पिढ्यांपासून तुमच्याकडे मुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका नष्ट करणार. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्याविरोधात प्रचारासाठी मुंबईत येणार. मुंबईला न्याय देण्यासाठी येणार. भ्रष्टाचारी लंकेला पराभूत करण्यासाठी माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी जाऊन प्रचार करेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
माझ्यावर जी कारवाई करण्यात आली त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. न्यायालयानं ज्या सूचना करण्यात आल्या त्यांचं पालन करणार आहेत. २७ एप्रिलला डॉक्टरांनी तातडीनं तपासणी करायला सांगितलं होतं. मात्र, ४ तारखेपर्यंत तपासणी करण्यात आली नाही, असं राणा म्हणाल्या.महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे नवनीत राणा यांनी यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हनुमान चालीसा पठण करणं आणि श्रीरामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर १४ दिवस नाही तर १४ वर्ष तुरुगांत राहण्यास तयार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. मी माझी लढाई पुढं सुरु ठेवणार आहे, असं राणा म्हणाल्या. माझ्यावरील कारवाई ज्या प्रकारे करण्यात आली ती जनतेनं पाहिली आहे.
अयोध्येत असली आणि नकली अशी बॅनरबाजी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी असली आणि नकली असा प्रकार केला नाही. मी नवी दिल्लीत जाऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवणार आहे. मुंबईत दबावात कामकाज केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे असली होते, जे अयोध्येत जाणार आहेत ते नकली आहेत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या दोन पिढ्यांपासून शिवसेनेची सत्ता आहे. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मी प्रचार करणार असून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचणार असल्याचं नवनीत राणांनी म्हटलं.
शिवसेनेकडूून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करण्यात येतो, असा आरोप देखील त्यांनी केला. मी मुंबईची मुलगी आहे मी सांगते की येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त भ्रष्टाचाराची लंका उदध्वस्त करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. तसेच मुंबई महापालिकेत शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी मी प्रचारासाठी उतरणार आहे. शिवसेनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी जाणार आहे, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांनी मला खड्ड्यात टाकण्याचं विधान केलं होतं. त्याविरोधात थेट पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.