भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

नौदलाच्या बोटीची प्रवाशी स्पीड बोटीला धडक, ७७ प्रवाशांना वाचविण्यात यश, तिघांचा मृत्यू, बोटीत खान्देशातील नागरिकांचा समावेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली. या बोटीमध्ये ८० प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७७ प्रवाशांचे रेस्कू करुन वाचवण्यात यश आले आहे. सात ते आठ प्रवाशी अजून बेपत्ता आहे. नौदलाच्या १४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे. यात खान्देशातील काही नागरिक हे बोटीत असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. त्यानंतर बोट उलटली.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये ८० प्रवासी आणि ५  बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी ४  वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!