“गिरीश महाजन माझे पादत्राणे घेऊनच मत मागायचे”, एकनाथ खडसेंचा पलटवार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची नुकतीच विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकार कोसळले, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली होती. त्यावर ‘गिरीश महाजन माझे पादत्राणे घेऊनच मत मागायचे’ असे खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
- गौप्यस्फोट ; ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
- …आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली. त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी महाजन यांचा समाचार घेतला. ते प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांना आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली. आजपर्यंत ते माझे पादत्राणे घेऊन मत मागत होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष जाते. त्यामुळेच त्यांना माझ्या पादत्राणांची त्यांना जास्त काळजी वाटते, असा हल्लाबोल खडसे यांनी केली.
एकनाथ खडसे विधान परिषदेचे आमदार झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे पडले आणि राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजपचे सरकार आले. त्यामुळे खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागले आहे. हाच धागा पकडत एकनाथ खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकार कोसळले, मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी त्यांची स्थिती झाली आहे,” अशी बोचरी टीका करत गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचले होते