उपमुख्यमंत्री अजित पवार नॉटरिचेबल, अजित दादा नाराज असल्याची चर्चा, नेमके गेले कुठे?
नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेले दोन दिवस झाले राज्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला पण खातेवाटप अजूनही रखडलेलं आहे. खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे कमालीचे नाराज असून गेल्या २४ तासांपासून नॉटरिचेबल आहेत. या आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ही नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी त्यांची नाराजी सुद्धा माध्यमांसमोर बोलून दाखविली.
महायुती सरकारमध्ये सत्ता स्थापने वेळी गोंधळ निर्माण झाला होता. आता खातेवाटपावरून अभूतपूर्व असता गोंधळ पाहण्यास मिळत आहे.
भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधी नाराज होते. त्यानंतर आता अजित पवार सुद्धा नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या २४ तासांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुठेच दिसले नाही. आता अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाच्या कामानिमित्त अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.