यावलसामाजिक

सोशल मीडिया जबाबदारी पूर्वक वापरण्याची गरज – सपोनी रामेश्वर मोताळे

पाडळसा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज, विठ्ठल कोळी | आगामी येणारे सण उत्सव च्या निमित्ताने फैजपूर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली यावेळी फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावचे पोलीस पाटील प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचा प्रभावी माध्यम बनला आहे. पण याचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा विघटनासाठी नव्हे काही वेळा अफवा खोट्या बातम्या किंवा द्वेष पूर्ण पोस्टद्वारे दोन जाती धर्मांमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आपण सर्वांनी जबाबदारीने वागून अशा गोष्टीला थांबवले पाहिजे खरं खोटं पडताळा कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट टाळा अशा पोस्टवर प्रतिक्रिया देऊ नका किंवा त्यांचा प्रसार करू नका एकता वाढवा सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या आणि सकारात्मक संदेशांचाच प्रसार करा आपण जर जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर केला तर समाजात सलोखा आणि शांतता टिकू शकतो त्याला आपली जबाबदारी ओळखू या आणि समाज जोडणारे हात बनवूया असे आवाहन फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत आव्हान केले या बैठकीला शहरातील नगरसेवक सर्व पक्षाचे पदाधिकारी परिसरातील पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!