यावल

दुचाकीचे टायर फुटून झाडावर आदळल्याने पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अचानक दुचाकीचे टायर फुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात यावल तालुक्यातील शिरसाड या गावाच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील शिरसाड येथील रहिवासी जगदीश वासुदेव अत्तरदे हे पत्नी हेमलता अत्तरदे यांच्या सह एमएच १९ एन २४३३ क्रमांकाच्या बॉक्सर या दुचाकीने भुसावळकडून यावलकडे येत असताना रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे अचानक टायर फुटल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून त्यांची बाईक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली.या झालेल्या भीषण अपघातात जगदीश वासुदेव अत्तरदे. वय ५३ वर्ष. रा. शिरसाड, ता. यावल. हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे. वय ४५ वर्ष. या गंभीर जखमी झाल्या असून माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होत जखमींना तातडीने सुरुवातीला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!