भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयशैक्षणिक

विद्यापीठातील शिक्षक पदासाठी यावर्षीपासून PhD अनिवार्य

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। नवीन नियमानुसार शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी पीएचडी आणि एनईटी National Eligibility Test (NET) अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियम 2018 मध्येच जाहीर करण्यात आला होता, पण याची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजु होऊ पाहाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे पीएचडी असणे गरजेचं असणार आहे. ‘झी न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या आधी पीएचडी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीसह NET परीक्षा पास असणाऱ्यांना विद्यापीठात सहाय्यक प्रोफेसर म्हणून संधी दिली जायची. सहाय्यक प्रोफेसर म्हणून निवड करताना NET परीक्षा पास असणाऱ्या उमेदवाराला 5 ते 10 गुणांचा लाभ मिळायचा, तर पीएचडी असणाऱ्या उमेदवारांना 30 गुणांचा लाभ मिळायचा. यापुढे फक्त NET परीक्षा पास असणाऱ्यांना सहाय्यक प्रोफेसर पदासाठी अर्ज दाखल करता येणार नाही. 2018 मध्ये UGC (University Grants Commission) चे नवीन नियम तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले होते. नवीन जागा या केवळ पीएचडी धारक उमेदवारांसाठी असतील. आम्ही यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे 2021 पासून सहाय्यक प्रोफेसर यांच्याकडे पीएचडी असायला हवी, असं जावडेकर त्यावेळी म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!