नवीन अॅप लाँच, आता आधार कार्ड ची झेरॉक्स नाही, फेस आयडी ने होणार ओळख
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एक नवीन आधार अॅप आणले आहे, आता तुम्हाला ओळख पटविण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देण्याची गरज राहणार नाही. आणि ती जपून ठेवण्याची गरज राहणार नाही. या नवीन अँप मुळे तुम्ही फक्त क्यूआर (QR) कोड स्कॅन करून किंवा तुमचा चेहरा दाखवून (फेस आयडी) तुमची ओळख पटवू शकाल.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन सुविधेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आधार पडताळणी आता अधिक सोपी, वेगवान आणि सुरक्षित होईल.” त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर टी करत म्हटले आहे की, “या अॅपमुळे फिजिकल कार्ड किंवा फोटोकॉपीची गरज नाही. फक्त एका क्लिकवर आवश्यक माहिती शेअर करा आणि तुमच्या गोपनीयतेवर पूर्ण नियंत्रण ठेवा.” अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
कोणत्या आहेत सुविधा या “अँप” मध्ये
फेस आयडी: चेहरा दाखवून ओळख पटवण्याची सोय यात आहे, जी खूप सोपी आणि सुरक्षित आहे.
क्यूआर कोड स्कॅनिंग: जसे आपण UPI पेमेंटसाठी कोड स्कॅन करतो, तसेच आधार पडताळणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल.