भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

निंभोऱ्यात आज १ तर खिर्डीत २ अहवाल कोरोना बाधित; खिर्डीतील एका महिलेचा मृत्यू !

निंभोरा (प्रतिनिधी)। येथील कोरोनाचा तपासणी अहवालत निंभोरा सेंटरला आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये गावातील पुन्हा १ पुरुष व्यक्तींला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे तर खिर्डी गावांतील २ वृद्ध महिलांचे अहवाल बाधित आले आहे. त्यातील एक महिलेचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेला बाधित रुग्ण ६२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहे,  सदरील रुग्ण सोनार गल्ली परिसरातील रहिवासी आहे. परिसरात चिंतेच्या वातावरणात भर पडली आहे  गावांतील बाधितांची संख्या ३८ झाली असून त्यात ८ उपचार घेत असून बाकी ३० जण सुखरूप घरी परतले असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच खिर्डी गावांतील अहवालात आज २ महिलांचे तपासणी अहवाल बाधित आले आहे त्यात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून एक ७० वर्षीय वृद्ध महिला उपचार घेत आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांचा दुजोरा मिळाला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!