आंतराष्ट्रीयप्रशासन

निवडणूक आयोगाच महत्वपूर्ण पाऊल,बोगस मतदानाला बसणार लवकरच आळा

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजरा होतो. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान ही खरी समस्या आहे. यावर भारतीय निवडणूक आयोगाने रामबाण उपाय शोधला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे (EVM) निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले आहे. पण आयोग गैरप्रकारांना 100% लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे.

निवडणुक आयोगाने मतदार यादीतील बोगस आणि डुप्लिकेट मतदारांचा पत्ता कट करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्त्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो. विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होतो. निवडणूक आयोग आता या बोगस आणि डुप्लिकेट मतदारांना आळा घालणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्ध करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी आता निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 56 कोटींहून अधिक मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक (Aadhaar Card Link) करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोग मतदान यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी व्यापक मोहिम राबविणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी मोहिम राबविण्यात येईल. त्यामुळे एकाच मतदाराचे दोन-तीन ठिकाणी नाव असेल तर ते हुडकून बंद करण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे काम सुरु आहे. हे लिंक करण्याचे काम सध्या स्वेच्छेने करण्यात येत आहे. त्यासाठी कुठलाही दबाव नाही. अथवा हे काम अनिवार्य करण्यात आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!