केंद्र सरकारकडून रेशन वर मोफत मिळणाऱ्या गहू व तांदूळ या योजनेला पुन्हा मुदतवाढ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारकडून एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यन्त प्राधान्य केशरी PHH , पिवळे BPL व अंतोदय अन्नसुरक्षा कार्ड पिवळे AAY यांना सरसकट १ किलो गहू व ४ किलो तांदूळ = ५ किलो याप्रमाणे पर माणसी मोफत रेशन मिळणार आहे .या बाबतचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.
दर महिना प्राधान्य केशरी कार्ड PHH , पिवळे BPL यांना रेशन माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ = ५ किलो, पर माणसी व अन्नसुरक्षा अंत्योदय कार्ड पिवळे AAY यांना पर शिधापत्रिका २० किलो गहू १५ किलो तांदूळ = ३५ किलो व साखर १ किलो विकतचे मिळतं आहे हे दर महिना मिळणारच आहे….
आधी केंद्र सरकार कडून दर महिना मोफतचे रेशन प्रत्येक रेशन कार्डधारक यांना ३ किलो गहू २ किलो तांदूळ = ५ किलो मिळत होते यामधे केंद्र सरकारने बदल करून आता ,अन्नसुरक्षा अंत्योदय कार्ड , PHH , BPL , AAY , शेतकरी कार्ड यांना सरसकट कार्डावरिल व्यक्तींच्या संखेनुसार फक्त मोफतचे रेशन १ किलो गहू व ४ किलो तांदूळ = ५ किलो या प्रमाणे मिळणार आहे … बाकी विकतचे दर महिना प्रत्येक रेशन कार्डवर मिळते त्या पद्धतीने मिळेलच. केंद्र सरकारने रेशनवर मोफत मिळणाऱ्या धान्याची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवल्याने या निर्णयाचे या योजनेत मोडणाऱ्या रेशनधारकांनी स्वागत केले आहे.