मोठी बातमी ; खाद्यतेलाच्या दरात घसरण
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। सर्वसामान्यांना वाढत्या महागाईतून काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण जागतिक बाजारात घसरण झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमतींवर झाला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय बाजारात भूईमुगाचं तेल वगळता इतर तेलाच्या दरात कपात झाली आहे.
तेल आयातदाराची चिंता वाढली
सध्या जागतिक बाजारात मंदीचं सावट आहे. यामुळे चिंतेचं वातावरण आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने तेलाचे भाव घसरले आहेत. यामुळे तेल आयातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. खाद्यतेल उद्योजकही संकटात आहेत. तेल आयातदारांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तेल उद्योजकांवर कर्ज बुडण्याचं संकट आहे. याचं कारण म्हणजे तेलाच्या दरात मोठी घसरण होणार आहे. पामतेलाचे दर सुमारे 20 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे म्हणजे पामतेलाचे दर 90 ते 92 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचतील. यामुळे उद्योजकांना नुकसान होईल.
अनेक तेलांचे दर घसरले
सोयाबीन तेल, मोहरीचं तेल आणि पामोलिन तेलाचे भाव परदेशातील घसरणीमुळे तोट्यात आहेत. परदेशातील तेलबियांच्या बाजारात प्रचंड अस्थिरता असून, त्यामुळे सर्वच नाराज आहेत. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन तेलबियांचे उत्पादन वाढवणं हा आहे.