भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयसामाजिक

खाद्यतेल, गॅससह अन्नधान्याचे भाव कमी होणार

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतच नाहीतर जगभरात महागाई कमी होण्याची शक्यता आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महागाई कधी कमी होईल हा मुद्दा आहे. तर येत्या वर्षात महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहे.

एका महिन्यानंतर पुढील वर्षी २०२३ मध्ये कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल, कापसाचे पीक आणि धातू क्षेत्रात जवळपास सर्वांचेच भाव १५% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२४ मध्ये या किंमतीमध्ये १२% पर्यंत कमी येण्याचा अंदाज आहे. यंदा कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस महागाई वाढीला कारणीभूत ठरले आहे. पुढील वर्षी या सर्वांचे भाव अत्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकते.

भारतीय कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षी कच्चे तेल, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड जवळपास १७% कमी होईल. कच्चे तेलाचे भाव ७५ डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता आहे. सध्या हा भाव ९० डॉलर च्या जवळपास आहे. या भावामध्ये जून २०२३ पर्यंत खाद्यतेलाच्या किंमतीतही मोठी कपात येण्याची शक्यता आहे. खाद्यतेल्याच्या किंमती मध्यंतरी उतरल्या होत्या. त्यात पुढील वर्षी कपात होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल १२-१५% पर्यंत उतरतील अशी आशा आहे.

युक्रेनकडे सूर्यफूल तेलाचा मोठा साठा आहे. देशात मोहरीचे ही मोठे उत्पादन होते. तर पाम तेलाच्या निर्यातकापैकी एक श्रीलंकाही लवकरच तेलाचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे तेलाची कमतरता कमी होईल आणि खाद्यतेल स्वस्त होतील. देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत नाही. तो दरवर्षी वाढत आहे. रब्बी हंगामात गहुचे उत्पादन १०-१५% वाढू शकते. तर मक्याचे उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती कमी होतील. कापसाचे उत्पादन ८-५% वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतही उत्पादन जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारताच्या कापसाच्या बाजारात सध्या स्पर्धा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!