भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

पत्नीला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव…. बॉस च्या मागणीने कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बदली हवी असेल तर आपल्या बायकोला एका रात्रीसाठी पाठव अशी मागणी केल्यानंतर गोकुल प्रसाद या कर्मचाऱ्याने लखीमपूरमधील कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतलं. त्या नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

गोकुल प्रसाद या कर्मचाऱ्याचा औषधोपचार सुरु असतानाही त्यांना त्रास देणं सुरु होतं. त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली होती जिथे त्यांना प्रवास करताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घऱाजवळ बदली करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावेळी पत्नीला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव आणि आम्ही तुझी बदली करु असे कनिष्ठ अभियंता नागेंद्र कु मार यांनी कर्मच्याऱ्याला मागणी केली होती

रुग्णालयात गोकुल प्रसाद यांनी व्हिडीओमध्ये आपण टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी कनिष्ठ अभियंता आणि त्याचा सहकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला. तसंच पोलिसांकडे मदत मागूनही मिळाली नसल्याचा दावा केला. दुसऱ्या एका व्हिडीओत, त्यांच्या पत्नीने आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पतीला त्रास देत असल्याचा आरोप केला. “ते तणावात गेले होते. औषधोपचार सुरु असतानाही त्यांना त्रास देणं सुरु होतं. त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली होती जिथे त्यांना प्रवास करताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घऱाजवळ बदली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्नीला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव आणि आम्ही तुझी बदली करु असं सांगितलं होतं,” अशी माहिती पत्नीने दिली आहे.

कोणीही मदत केली नसल्याचा दावा पत्नीनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित व्यक्तीने कनिष्ठ अभियंता बदली करण्यासाठी पैसे मागत असल्याचा तसंच आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचा आऱोप केला होता. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्याला निलंबित करण्यात आलं असून त्याची विभागीय चौकशी सुरु आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे”.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!