भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बाबत केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्व सामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही पण पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी हैराण झाला असेल तरी ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरु शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधनाच्या किंमतींविषयी मोठे वक्तव्य केले आहे. असे पहिल्यांदा घडले आहे की, गेल्या ६ महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. पण आता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलाचे दर कमी आहेत.सध्या क्रुड ऑईलच्या किंमती $90 प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत. सध्या या किंमती $82 च्या जवळपास आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमतीत ७% घसरण दिसून आली. त्यामुळे केंद्र सरकारवर किंमती कमी करण्यासाठी दबाव आला आहे. केंद्र सरकार आता प्रत्येक १५ दिवसानंतर इंधनावरील कराचा आढावा घेणार आहे. केंद्र सरकार कच्चे तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमती, विमान इंधन (ATF) यांच्यावरील कराचा आढावा घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!