भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाला नवा ध्वज व चिन्ह!

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.

नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी न्याय आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा नवा ध्वज आणि बोधचिन्हाची कल्पना सादर केली आहे. या नवीन ध्वजात अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे पुस्तक दाखविण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला हजेरी लावली. या परिषदेला देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा न्यायपालिकेतील ८०० हून अधिक न्यायाधीश उपस्थित होते. परिषदेला संबोधित करण्यासोबतच राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वजाचे आणि बोधचिन्हाचे अनावरण केले. तथापी, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनीही परिषदेला संबोधित केले.

जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वज आणि चिन्हाचे अनावरण करण्यात आले. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!