चीनमधून पसरतोय बर्ड फ्लू? मानवामध्ये आढळला H10N3 स्ट्रेन
Monday To Monday NewsNetwork।
नवीदिल्ली (वृत्तसंस्था)। चीनमधून पसरलेल्या घातक कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरलेय. आतपर्यंत कोट्यावधी नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. लाखोच्या घरात रुग्ण ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शनच्या अभावी मृत्यूमुखी पडली. अशातच चीनमधून पुन्हा एका विषाणू मानवाच्या विनाशासाठी सज्ज झाला आहे. कारण चीनमध्ये आता पहिल्यांदाच बर्ड फ्लूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. ४१ वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन आढळला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेनेही ही माहिती अधिकृत असल्याचे जाहीर केले. हा व्यक्ती चीनच्या झिनजियांग शहरातील आहे.यावर एनएससीने सांगितले की, ताप आणि इतर लक्षण आढळल्याने त्या व्यक्तीला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यानंतर म्हणजे २८ मे रोजी या व्यक्तीच्या शरीरात H10N3 हा स्ट्रेन आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु या व्यक्तीला या विषाणूची लागण कशी झाली याची माहिती एनएचसीने अद्याप दिलेली नाही
चीनमधून पसरलेल्या घातक कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरलेय. आतपर्यंत कोट्यावधी नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. लाखोच्या घरात रुग्ण ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शनच्या अभावी मृत्यूमुखी पडली. अशातच चीनमधून पुन्हा एका विषाणू मानवाच्या विनाशासाठी सज्ज झाला आहे. कारण चीनमध्ये आता पहिल्यांदाच बर्ड फ्लूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. ४१ वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन आढळला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेनेही ही माहिती अधिकृत असल्याचे जाहीर केले. हा व्यक्ती चीनच्या झिनजियांग शहरातील आहे,यावर एनएससीने सांगितले की, ताप आणि इतर लक्षण आढळल्याने त्या व्यक्तीला २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यानंतर म्हणजे २८ मे रोजी या व्यक्तीच्या शरीरात H10N3 हा स्ट्रेन आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु या व्यक्तीला या विषाणूची लागण कशी झाली याची माहिती एनएचसीने अद्याप दिलेली नाही.
H10N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू चीनमध्ये आढळून आला असला तरी तो कोरोना इतका घातक किंवा गंभीर स्वरुपाचा नाही. यावर एनएसचीने सांगितले की, हा विषाणू मोठ्याप्रमाणात पसरण्याची शक्यता फार कमी आहे. कारण या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरचं रुग्णालातून सोडण्यात येईल. तसेच H10N3 ची लागण झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र त्यांना कोणताही संसर्ग झाल्याचे आढळले नाही.
चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आढळले आहेत. आणि त्यापैकी अनेक स्ट्रेनने बऱ्याच जणांना संक्रमित केले आहे. विशेषतः पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना याचा अधिक त्रास होत आहे. एनएचसीने असेही म्हटले आहे की, H10N3 हा बर्ड फ्लूचा स्ट्रेन जगभरातील कोणत्याही मनुष्यात आढळलेला नाही. चीनमध्ये आढळून आला असला तरी तो कोरोना इतका घातक किंवा गंभीर स्वरुपाचा नाही. यावर एनएसचीने सांगितले की, हा विषाणू मोठ्याप्रमाणात पसरण्याची शक्यता फार कमी आहे. कारण या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरचं रुग्णालातून सोडण्यात येईल. तसेच H10N3 ची लागण झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र त्यांना कोणताही संसर्ग झाल्याचे आढळले नाही.चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आढळले आहेत. आणि त्यापैकी अनेक स्ट्रेनने बऱ्याच जणांना संक्रमित केले आहे. विशेषतः पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना याचा अधिक त्रास होत आहे. एनएचसीने असेही म्हटले आहे की, H10N3 हा बर्ड फ्लूचा स्ट्रेन जगभरातील कोणत्याही मनुष्यात आढळलेला नाही.