महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटचा संसर्ग !
Monday To Monday NewsNetwork।
नवीदिल्ली( वृत्तसंस्था)। कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना कोरोनाचे नवीन विभिन्न व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहेत. दरम्यान, बेल्जियममध्ये कोरोना विषाणूचा एक अनोखा व्हेरिएंट समोर आला आहे. बेल्जियममधील एका महिलेला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आहे. एकाच वेळी कोरोना विषाणूच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या महिलेचा अवघ्या पाच दिवसात मृत्यू झाला. ही अनोखी घटना समोर आल्यानंतर संशोधकही चिंतेत आले आहे. संशोधकांच्या मते, अशाप्रकारची घटना कोरोना विषाणूंविरूद्ध असणारी लढाई अधिक चिंता वाढवू शकातात. असा घडला प्रकार
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ९० वर्षांच्या या महिलेला एकाच वेळी अल्फा आणि बीटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले. या महिलेने कोरोना लस घेतली नसल्याने तिची ही केस अधिकच गंभीर बनली. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घरीच ही महिला तिच्यावर उपचार करून घेत होती. त्यांची प्रकृती खालावली तेव्हा तिला मार्चमध्ये बेल्जियमच्या ओएलव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची कोरोना टेस्ट रुग्णालयात झाली ज्यामध्ये तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला महिलेची ऑक्सिजन पातळी चांगली होती, परंतु नंतर तिची तब्येत कमी वेळात जास्त खालावत गेली आणि पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला.
या महिलेच्या मृत्यूनंतर, जेव्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी महिलेला कोरोनाच्या कोणत्या कोणत्या व्हेरिएंटने संक्रमित केले होते, हे शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेव्हा तिच्यामध्ये कोरोनाचे अल्फा आणि बीटा दोन्ही व्हेरिएंट सापडले. अल्फा व्हेरिएंट सर्वप्रथम ब्रिटनमध्ये तर बीटा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत प्रथम सापडला आणि त्याचा कहर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आले. समोर आलेल्या या प्रकारानंतर संशोधक अशा बाबी गंभीरपणे घेण्याचा सल्ला देतात. लेखक आणि आण्विक जीवशास्त्रज्ञ डॉ ऐने वेंकरबर्गेन यांनी असे सांगितले की, को-इन्फेक्शनची ही पहिली घटना आहे ज्यामध्ये एकाच शरीरात दोन कोरोना विषाणूचे व्हेरिएंट आढळून आले आहेत. अशा केसेस अधिक चिंताजनक ठरत असून संशोधक देखील चिंताग्रस्त झाले आहेत.