भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

अवैध गुटखासाठा गोदामावर छापेमारी : ३८ लाखांचा घुटका जप्त !

Monday To Monday NewsNetwork।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  येथील पेठ-बलसाड रोडवरील भारत पेट्रोल पंपासमोर असलेल्या गुदामावर छापा मारून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 38 लाख 19 हजार 200 रुपयांचा गुटखा धाड टाकून जप्त केला आहे.

सविस्तर माहिती अशी, पेठ-बलसाड रोडवरील भारत पेट्रोल पंपासमोर संशयित ट्रकचालक सुभाष नारायण पालवे (वय 57, रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), क्लिनर शिवाजी रामू कराड (वय 48, रा. एम. आय. डी. सी., गजानन कॉलनी, अहमदनगर), वाहनमालक विनित गिरीधारीलाल जकी (रा. अहमदनगर) अशी अवैध गुटखासाठा वाहतूक करणाऱ्या अटक केलेल्यांची नावे आहेत. सुभाष पालवे हा त्याच्या ताब्यातील एमएच 16 सीसी 2842 या क्रमांकाच्या टाटा अल्ट्रा वाहनातून स्वत:च्या फायद्यासाठी चोरट्या पद्धतीने व साड्यांच्या बंडलच्या मागे खोट्या बिलाच्या नावावर मानवी सेवनास व शरीरास अपायकारक करणारे कर्करोगासारख्या दुर्धर आजारास कारणीभूत ठरणारे घटक वाहून नेत असताना पोलिसांनी पकडले.

या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी संदीप शिवाजी देवरे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये 26 लाख 13 हजार 600 रुपये किमतीच्या पानमसाल्याच्या पुड्या असलेल्या तागाच्या 60 गोण्या, 2 लाख 90 हजार 400 रुपये किमतीच्या व्ही-1 तंबाखूमिश्रित पुड्या, 7 लाख 77 हजार 920 रुपये किमतीच्या केशरयुक्त विमल पानमसाल्याच्या पुड्या, 1 लाख 37 हजार 280 रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखूच्या पुड्या, तसेच 12 लाख रुपये किमतीचे अल्ट्राटेक वाहन असा सुमारे 50 लाख 19 हजार, 200 रुपयांचा मुद्देमाल या पथकाने छापा टाकून जप्त केला आहे. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188, 272, 173, 420, 34, 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसावे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!