भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ – जळगाव रेल्वे प्रवाशांसाठी बातमी : नवीन अतिरिक्त विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक व थांबा असा असेल

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ व जळगाव रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते नागपूरदरम्यान दोन अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे ही ट्रेन भुसावळ आणि जळगाव स्थानकावर थांबणार आहे.

त्या गाडीचे वेळापत्रक असे…
०९१०९ क्रमांकाची विशेष गाडी २६ ऑगस्टला मध्यरात्री १२.३० वाजता सीएसएमटी मुंबई येथून सुटेल. त्याच दिवशी सकाळी ७.वाजून २३ मिनिटाने जळगावला तर ८ वाजेल भुसावळ स्थानकावर पोहोचेल. त्यांनतर दुपारी ३.४० वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०११०२ क्रमांकाची विशेष गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर येथून सुटेल. तर दुसऱ्या दिवशी भुसावळ रात्री १२. वाजून ३५ मिनिटाने, जळगाव स्थानकावर रात्री १ वाजेल पोहोचेल. त्यांनतर सकाळी ८.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ..
या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे असतील.

या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह असतील. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येणार.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!