भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

Nashik Oxygen Leak : नाशिक मध्ये ऑक्सिजन गळती; प्राणवायू अभावी 22 रुग्ण दगावल्याची माहिती

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक ( निशांत साळवे )। नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली असून ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित होता या दरम्यान 22 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली,लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता.यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर, व्हेंटिलेटरवर आणी अत्यवस्थ 67 रुग्ण आहेत. टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनची किरकोळ गळती झाली असून कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं या बाबत बोलताना सुरुवातीला म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनीही या घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, या आकड्यामध्ये आता वाढ होत असल्याचं चित्र आहे. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाणार असल्याचंही टोपे यांनी या वेळी सांगितलं . पालिकाआयुक्तांच्या म्हणण्या नुसार झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे, या घटनेत 10 ते 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता याप्रकरणाबाबतची अधिक माहिती समोर आली असून यात आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!