रावेरसामाजिक

निंभोरा येथील मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आ.शिरीष चौधरीच्या हस्ते धनादेश सुपूर्द

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

निंभोरा (सागर तायडे)। येथील तरुण शेतकरी दीपक पद्माकर पाटील यांचे मागील वर्षी निधन झाले होते.त्यांना आ.शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा चेक मयत शेतकरी दीपक पाटील यांच्या पत्नी प्रणिता दीपक पाटील यांना देण्यात आला.यावेळी आ.शिरीष चौधरी यांच्या समवेत रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे,मंडळाधिकारी सचिन पाटील,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद,नितीन पाटील,हेमंत चौधरी,किरण कोंडे,संदीप महाले,रितेश महाले,जितेंद्र सोनवणे,पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

मयत शेतकरी दीपक पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण व्हावे यासाठी शासनातर्फे ही मदत देण्यात आली असून अशा दुर्दैवी स्थितीत कुटुंबाला सावरून संसाराचा गाडा चालविण्यासाठी धीर देण्याचे काम शासनातर्फे होत असल्याची भावना आ शिरीष चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!