भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

निंभोरा पोलिस स्टेशनच्या फौजदाराला लाच प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी

सावदा.ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुटखा प्रकरणात जप्त केलेल्या इर्टिगा वाहनाला न्यायालयाने सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले परंतु ते वाहन सोडण्यासाठी निंभोरा पोलिस स्टेशन चे फौजदार कैलास विश्वनाथ ठाकूर वय ५६ वर्ष. रा.निंभोरा. ता. रावेर यांनी सुरुवातीला १५ हजार व तडजोडी अंती १० हजार रुपये मागितले या प्रकरणी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रावेर तालुक्यातील निंभोरा येथून कैलास ठाकूर यांना अटक केली.

ज्या पोलिस स्टेशनला काम केले त्याच पोलिस स्टेशन मध्ये स्वतः वर गुन्हा दखल करण्याची वेळ फौजदारावर आली. गुरुवार रोजी ठाकूर यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सविस्तर असे की, जळगाव येथील सिंधी कॉलनीतील गुटखा व्यावसायिकांचे वाहन गुटखा प्रकरणात निंभोरा पोलिसांनी जप्त केले. वाहन धारकाने वाहन सोडण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यावर वाहन सोडण्याचे आदेश देण्यात आले. सदरचे आदेश निंभोरा पोलिस स्टेशन चे फौजदार कैलास ठाकूर याना दाखविल्यानंतर त्यांनी १२ तारखेला बुधवार रोजी १५ हजारांच्या लाचेची मागणी केली शेवटी तडजोडी अंती दहा हजार देण्याचे ठरले .

दरम्यान तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार दाखल केली.त्या नुसार सापळा रचण्यात येऊन फौजदार कैलास विश्वनाथ ठाकूर यांना त्यांच्या घरा जवळील मरिमाता मंदिराजवळ १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई जळगाव एसीबी चे पोलिस उप अधीक्षक सुहास डी देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नेत्रा ऐन जाधव.अमोल वालझाडे,दिनेश पाटील,अमोल सुर्यवंशी आदी पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!