गावातील सैन्य दलाततील जवानांची नावे ग्रामपंचायत फलकावर लावण्याची युवासेनेची मागणी
Monday To Monday NewsNetwork।
निंभोरा ता.रावेर (सागर तायडे)। दि:- 25/07/21 रोजी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सैन्यदलातील आजी-माजी जवानांची नावे ग्रामपंचायतीच्या आत फलकावर लावण्याची शिवसेना युवासेनेने केली आहे.
निंभोरा बु येथील तरुण व तरूणी भारतीय देशसेवेत कार्यरत असुन. सैन्यदलात हे तरूण-तरुणी विविध पदांवरती कार्यरत आहेत,आज ते गावाचे वैभव आहे.गावातील तरूणांसाठी ते आदर्श ठरत असून,अशा तरूणांचा गावाला नक्कीच अभिमान आहे.अशा जवानांना गावाच्या वतीने बहुमान मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या आत फलकावर या जवानांची नावे लिहावी,अशी मागणी शिवसेना युवासेना व ग्रा.पं.सदस्य स्वप्निल भिमराव गिरडे यांनी निवेदना द्वारे केली निवेदन देतांना माजी.प.स.प्रमोद कोंडे , ग्रा.पं.सदस्य स्वप्निल गिरडे,विलास महाले,उमेश पाटील,मोहन महाले,अजय महाले,मोन्टी तायडे व इतर उपस्थित होते