भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रसामाजिक

“ना उम्र की सीमा”…ना ‘बंधन’.., “अजब लव्हस्टोरी” ३६ वर्षाची प्रेमवीर महिला, १६ वर्षाच्या मुलाला घेऊन रफुचक्कर

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l असं म्हटलं जात प्रेम आंधळ असतं. खरंच प्रेम आंधळं असतं? मात्र या घटने कडे पाहून वाटत ! प्रेमाला ‘ना उम्र की सीमा’ ना ‘बंधन’, असतं. हेच या घटनेतून उघड होतं. ती महिला ३६ वर्षांची, ती तीन लेकरांची आई होती. तर तिचा प्रियकर १६ वर्षांचा म्हणजेच तिच्या मुलाच्या वयाचा आहे. ही घटना नागपूर मधली.

एका धार्मिक स्थळी ते दोघेही यायचे. नजरानजर झाली, प्रेम झाले. वयाची बंधने झुगारून दोघे एकमेकांच्या प्रेमात (?) पडले. वयाच्या मर्यादेमुळे समाज आपल्याला जगू देणार नाही, असे महिलेला वाटले. त्यामुळे या विवाहित महिलेने आपल्या या १६ वर्षीय प्रियकराचे चक्क अपहरण केले. चार महिने त्याच्यासोबत ‘संसार’ही केला.

चार महिने दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याचदरम्यान मुलाला इन्स्टाग्रामची सवय जडली अन् तो पोलिसांना सापडला. पोलिसांनी महिलेला अपरहण प्रकरणात ताब्यात घेत मुलाला नातेवाइकांच्या स्वाधीन केले.

ही ३६ वर्षीय महिला विवाहित असून, तिला तीन अपत्ये आहेत. तिचा पती श्रमिक आहे. मुलगा अकरावीत आहे. नोव्हेंबर महिन्यात ही महिला व त्या १६ वर्षीय मुलाची ओळख झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लपूनछपून ते भेटायला लागले. ती त्याच्या शिवाय राहू शकत नव्हती. ती त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. दोघांनी संसार फुलविण्याचा निर्णय घेतला. २ डिसेंबरला महिला व मुलाने नागपुरातून पलायन केले. दोघेही बालाघाट येथे राहायला लागले. मुलाच्या घरी खळबळ उडाली. त्याच्या वडिलांनी शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. वडिलांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!