तुम्ही खातायं तो मसाला बनावट तर नाही ना? लाखो रुपयांचा मसाला जप्त, महाराष्ट्रासह इतर राज्यांत विक्री केला जातोयं बनावट मसाला
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l स्वयंपाक घरात वापरण्यात येत असलेला बनावट मसाला तयार करून खऱ्या मसाले पाकिटावर ई हाल मार्क असतो अगदी तसाच परंतु बनावट हाल मार्क लाऊन त्या बनावट पाकिटात बनावट मसाला भरून लाखो रुपयांचे बनावट मसाल्यांची पाकिटे पोलिसांनी जप्त करून पोलिसांनी पर्दा फाश केला.हा बनावट मसाला गुजरात राज्यातील सुरत मधील एका फॅक्टरीत तयार करण्यात येत होता. जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे उघळ झाले. या पूर्वी बनावट जिरे विक्री करणारांवरही कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली होती.
भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व पोलिस पथकाने जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचत जोगेश्वरी येथून आलेला एक संशयित टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली. त्या मध्ये १ लाख ८ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला,एव्हरेस्ट मटण मसाला आणि मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले
. टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव आणि माल विक्रीसाठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान दोघे रा. जोगेश्वरी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीत हे बनावट पॅकिंग माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याचे समजले. पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला. तेथे सुरेशभाई मेवाड हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिस पथकाने तेथील कच्चा माल आणि मशीन व फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे.
हा बनावट मसाला महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचविला जात असल्याची माहिती मिळत असून महाराष्ट्रात कुठे कुठे माल विक्री केला जातो. कधी पासून विक्री केला जातो. तसेच या विक्री करणाऱ्यांच्या साखळीत आणखी कोण कोण सामील आहेत. या बाबत पोलिस तपास करीत असून एव्हरेस्ट कंपनीचे सेल्स मन यांच्या तक्रारी वरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने संताप व्यक्त केला जात असून सक्त कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.