महाराष्ट्र

लाडकी बहीणच नव्हे तर ‘भावाला’, आले चक्क ३०००, अर्ज न करताही पुरुषाच्या खात्यावर पैसे जमा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कुठलाही अर्ज न करता,कोणतेही कागदपत्र जमा न करता चक्क भावाला म्हणजेच पुरुषाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे आल्याने तरूणही आच्चर्य चकित झाला.

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भलतीच चर्चेत आली आहे. बहिणीच्या खात्यात पैसे जमा करता – करता महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेचे पैसे चक्क यवतमाळच्या आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील जाफर गफ्फार शेख या तरुण पुरुषाच्या खात्यात जमा झाले.

आधार लिंक नसल्याच्या कारणावरून अनेक महिला भगिनिंचे पैसे जमा झाले नाही. मात्र यवतमाळ येथे बँक ऑफ बडोदा मध्ये या तरुणाचे खाते असून हे खाते तरुणाने २०१२ मध्ये उघडल होत. त्या नंतर त्याने कुठलाही व्यवहार केलेला नाही.तरीही या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ३००० रुपये जमा झाल्याने ही योजना यवतमाळ जिल्ह्यात वेगळ्याच कारणाने चर्चेत आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!