जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक पदी योगेश ठाकूर यांची नियुक्ती
जळगांव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक म्हणून योगेश गंगाधर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून योगेश ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जळगावचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसेच जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांची ला.प्र.वि.नाशिक येथे अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या जागी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची ला.प्र.वि. जळगांव येथे बदली झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांवचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालय येथे अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर यांची बदली झाल्याने त्यांनी दि. २७ ऑगस्ट मंगळवार रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार स्विकारला.
कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधून निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असून सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व तक्रारी संबंधी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.