ब्रेकिंग न्यूज : विधानसभा निवडणुकी बाबत मोठी अपडेट, महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणुक केव्हा लागणार, आचारसंहिता केव्हा लागणार या बाबत मोठी उत्सुकता वाढली असतानाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखां संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.वत्या साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसाचे दिवस पाहता याबदरम्यान आचारसंहिता आणि प्रचाराचा धुरळा ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी आता थेट दिवाळीनंतरच निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अस्तित्वात येण अपेक्षित आहे. नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यास साधारण १४ किंवा १५ नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने
आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यातच लागू होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. राज्यात विधानसभा निवडणुक केव्हा लागणार सप्टेंबर की ऑक्टोबर अशी चर्चा सुरू असतानाच आता विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लगेचच पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकी साठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याने त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होते की गणितं बदलणार ? हे तर वेळच सांगणार. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका आघिकृत जाहीर केलेल्या नसून घोडा मैदान मात्र जवळच आहे.