आता कामाचा ५ दिवसांचा आठवडा, बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील २ दिवस सुट्टी?
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बॅंक कर्मचारी खूप मोठ्या काळापासून कामाचा ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. २०२४ संपेपर्यंत त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना २ दिवसांची सुट्टी देण्यासंदर्भात इंडियन बॅंक असोसिएशन आणि कर्मचारी यूनियन यांच्यात एक सामंजस्य करारावर हस्ताक्षर झाले आहेत. २०२४ संपेपर्यंत ही मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील २ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. ५ दिवसांचा आठवडा केला तरी ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेच्या तासांवर याचा परिणाम होणार नाही, असे आश्वासन फोरमने दिले आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये इंडियन बॅंक असोसिएशनकडून एका करारावर हस्ताक्षर करण्यात आले. यामध्ये ५ दिवस कामाच्या प्रस्तावाचा समावेश होता. यावर सरकारची मंजूरी मिळण्याची वाट पाहिली जात आहे. यानंतर ८ मार्च २०२४ ला आयबी आणि बॅंक युनियनच्या ९ व्या संयुक्त नोटवर सह्या करण्यात आल्या. आयबी आणि बॅंक यूनियच्या नवव्या संयुक्त नोटवर सह्या करण्यात आल्या. आयबी आणि इंडिया बॅंक ऑफिसर्स कोफेडरेशनने सही केलेल्या संयुक्त नोटनुसार, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीसहित ५ दिवसाच्या कामाचा आठवडा कसा असेल याची रुपरेषा देण्यात आली आहे.
आयबी आणि बॅंक यूनियन याच्याशी सहमत आहे पण सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. याचा संबंध बॅंकेचे तास आणि बॅंकांचे अंतर्गत कामकाज यांच्याशी येतो. म्हणून या प्रस्तावावर भारतीय रिझर्व्ह बॅंकेसोबतदेखील चर्चा केली जाणार आहे. २०२४ च्या अखेरिस किंवा २०२५ च्या सुरुवातीला सरकारकडून यासंदर्भात नोटिफिकेशन येण्याची शक्यता असल्याचे बॅंक कर्मचारी सांगतात. एकदा मंजूरी मिळाल्यानंतर शनिवारी निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अॅक्टच्या सेक्शन २५ अंतर्गत अधिकृत मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.
सरकारने या ५ दिवस वर्किंगला मंजुरी दिली तर रोजच्या कामात 40 मिनिटांची वाढ केली जाऊ शकते. बॅंक कर्मचाऱ्यांना रोज ४० मिनिटे जास्त काम करावे लागेल. म्हणजेच सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० ही बॅंकेची वेळ असू शकते. बॅंकांच्या शाखा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. बॅंक यूनियन्सनी २०१५ पासून शनिवार, रविवार सुट्टीची मागणी केली आहे. २०१५ मध्ये १० व्या द्विपक्षीय करारानुसार आरबीआय आणि सरकारने आयबीसोबत सहमती दर्शवली. यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टीची घोषणा केली.