संरपचाची निवड जनतेतूनच होणार, विधानसभेत विधेयक मंजूर !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा (shinde government) लावला आहे. आता राज्यात सरपंचाची निवड (sarpancha election ) ही जनतेतूनच होणार आहे, यावर विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं सत्तेत आल्यावर रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. आज सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीष महाजन यांनी मांडले आणि शिंदे सरकारने आधीच्या सरकारने घेतला निर्णय आता मोडीत काढला आहे. जनतेतून थेट सरपंच निवडीचे विधेयक बहुमताने पारीत करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीचं एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.