भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आता वीजेच मीटरही करावं लागणार रिचार्ज, रिचार्ज संपलं की वीज बंद, प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करत जोरदार विरोध

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वीजेचं स्मार्ट मीटर हे मोबाईलच्या रिचार्जसारखं आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर लावल्यावर रिचार्ज करावं लागेल त्यानंतर वीज सुरू होईल. रिचार्ज संपलं की घरात वीज बंद होईल. रिचार्ज संपण्याच्या २ दिवसांपूर्वी मोबाईलवर तसा मेसेजही येईल. म्हणजेच रिडींग घेऊन बिलं देण्याची पद्धत बंद होईल. प्रिपेड स्मार्ट  मीटर ला राज्यभरातून विरोधी होत असून सरकार बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

आता मोबाईलसारखं वीजेच्या मीटरचंही करावं लागणार रिचार्ज, नेमकं काय आहे स्मार्ट मीटर?
आता तुम्हाला मोबाईल फोनप्रमाणे वीजेच्या मीटरचं रिचार्ज करावं लागणार आहे. त्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यास सुरूवात झाली. मात्र ऊर्जामंत्री असणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातून आणि विदर्भातून स्मार्ट मीटर विरोधात जोरदार विरोध सुरू आहे. या आंदोलनावेळी पुतळे जाळण्यात आलेत.

तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशाराही नागरिकांनी दिला. वीजेचं स्मार्ट मीटर नेमकं काय? वीजेचं स्मार्ट मीटर हे मोबाईलच्या रिचार्जसारखं आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर लावल्यावर रिचार्ज करावं लागेल त्यानंतर वीज सुरू होईल. रिचार्ज संपलं की घरात वीज बंद होईल. रिचार्ज संपण्याच्या २ दिवसांपूर्वी मोबाईलवर तसा मेसेजही येईल. म्हणजेच रिडींग घेऊन बिलं देण्याची पद्धत बंद होईल. एका महिन्यात बिल भरलं नाहीतर पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्यांचं बिल भरण्याची पद्धतच बंद होईल. म्हणूनच वीजेच्या स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याचे दिसतंय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!