…आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली, विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित करून धोबीपछाड मारला. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे २३६ पर्यंत जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही गाठता आला नाही.
महायुतीला मिळालेल हे अनपेक्षित यश महाविकास आघाडीतील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांनाही चकित करणारं आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मतदारांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात नगरपालिका, महापालिकेसह ,जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार राज्यात गेल्या अनेक वर्षां पासून प्रशासकां मार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घ्याव्या अशी मागणी केली जात आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्येही याबाबत सकारात्मक भूमिका आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.