भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुन्हा पाऊस, पुढील चार ते पाच दिवस “या” ठिकाणी पडणार पाऊस

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची सक्रिय होणार असून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

जुलै महिन्यात राज्याला पावसाने चांगलच झोडपलं. मात्र आगष्ट महिन्याच्या सुरुवाती पासूनच पावसाने विश्रांती घेतली, मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अहमदनगर, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही रिमझिम पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज पासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

नागपूर शहर, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!