भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील पाडळसे शाळेत पोषण आहार तांदूळ चोरी उघडकीस : शाळेचा कर्मचारी अडकल्याने खळबळ

पाडळसे, तालुका – यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l लोक विद्यालय शाळेतील पोषण आहारासाठी ठेवलेले तांदूळ चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाळेतील कर्मचारी राजू बऱ्हाटे सह आणखी दोघं हे तांदूळ चोरी करताना प्रत्यक्ष सापडले असून, या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील लोक विद्यालय शाळेतील पोषण आहारासाठी ठेवलेले  १२५० रुपये किमतीचे ५० किलो तांदूळ शाळेतील शिपाई राजू बऱ्हाटे व घनशाम मुरलीधर चौधरी आणि अतुल भास्कर चौधरी. तिघे राहणार – पाडळसे ता. यावल जि. जळगाव. यांनी संगनमताने चोरून नेल्याचा गुन्हा शाळेचे मुख्याध्यापक समाधान रुपचंद भोई यांचे तक्रारीवरून फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. नागरिकांच्या मते, शाळेत पोषण आहारासाठी ठेवलेले तांदूळ चोरीला जाण्याचे प्रकार यापूर्वीही घडले असण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी राजू बऱ्हाटे व घनशाम चौधरी आणि अतुल चौधरी यांना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना आज मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान घडली.

या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर परिणाम होणार असल्याने पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेने शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!