फडणवीस आणि दरेकर दिल्लीत,भाजपमध्ये हालचालींना वेग
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आधीच दिल्लीत दाखल झाले आहे. आता त्यापाठोपाठ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर सुद्धा नवी दिल्लीत दाखल झाले आहे. थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे आहेत. फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहे. तसंच, नवनियुक्त केंद्रीय मंत्री व खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांचा दौरा गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू आहे. दिल्लीचा दौरा सुरू होताच राज्य संघटनेने बदल होतील अशा प्रकारच्या वृत्तांना हवा मिळाला सुरुवात झाली होती. मात्र, दुपार होताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राज्य सरचिटणीस चंद्र चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, जयप्रकाश रावल, संजय कुटे, श्रीकांत भारतीय आदींचा काल सुरू झालेला दिल्ली दौरा आगामी दहा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
केंद्रात महाराष्ट्रातून नियुक्त झालेले सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोबत या भाजपच्या नेत्यांची भेट होणार आहे. या नेत्यांसोबत भेटून त्यांच्या मंत्रालयाचा राज्याला कसा फायदा होतो याची माहिती घेण्याकरिता आलो आहे, असं चंद्रकांत दादा यांनी सांगितलं. मात्र या दिल्ली दौऱ्याच्या माध्यमातून चंद्रकांत दादा आपले शक्तीप्रदर्शन तर करीत नाही ना असा एक सवाल निर्माण होत आहे.
दरम्यानच्या काळात अमित शहा यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली या भेटीनंतर त्यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदावर लागेल अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला हवा देऊ नये, असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस दिल्लीचा पोहोचले असून उद्या रावसाहेब दानवे यांच्या घरी सर्व भाजप खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे, बी एल संतोष उपस्थित राहणार आहेत.