भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर, डेथ सर्टिफिकेटवर ‘कोरोनामुळे मृत्यू’ असा उल्लेख करणं बंधनकारक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोना संसर्गामुळे देशात हाहाकार उडाला होता. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, आता जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल तर त्याच्या डेथ सर्टिफिकेटवर ‘कोरोनामुळे मृत्यू’ असा उल्लेख करणं बंधनकारक असेल, असा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर केंद्र सरकारने आणि इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने सर्व राज्यांना हे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या या आदेशाच्या आधी ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या लोकांच्या परिवारालाही अशा प्रकारचे डेथ सर्टिफिकेट मागण्याचा अधिकार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणांवर विचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक समिती नियुक्त करण्यात येणार असून ही समिती अशा अर्जांवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेणार आहे.

यापूर्वी एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (NDMA) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवाराला किमान आर्थिक मदत करण्याचा आदेश दिला होता. ३० जून रोजी असा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्या लोकांच्या डेथ सर्टिफिकेटवर ‘कोरोनामुळे मृत्यू’ अशी नोंद करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. पण यावर कारवाई करण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. आता केंद्राने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रक सादर करुन अशी व्यवस्था निर्माण करत असल्याचं सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!