भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयशैक्षणिक

महाराष्ट्रातील एका विद्यापीठासह देशात 24 विद्यापीठे बोगस,

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील 24 स्वयंघोषित विद्यापीठे बनावट असल्याचे जाहीर केले असून 2 विद्यापीठांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नावर उत्तर देताना प्रधान यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे UGC ने 24 विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून UGC च्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही संस्थांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली,

सर्वाधिक बोगस 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशात दिल्लीमध्ये 7 आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी 2 तर कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी 1 विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं नाव आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!