भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

कोरोनानंतर अनेक रुग्ण फायब्रोमायल्जियावर घेतआहेत उपचार,विविध आजारांनी डोकं वर काढलंय का?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। कोविडमधून बरे झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात फायब्रोमायल्जियावर उपचार घेत आहेत. हे लोक स्नायू, अस्थिबंधन आणि हाडांच्या वेदनांनी त्रस्त आहेत. अनेकदा त्यांच्यामध्ये थकवा येतो 6आणि पोटाच्या समस्याही कायम राहतात. कोरोनाची लागण झालेल्या लोकांना वर्षभरानंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉक्टर देखील आश्चर्यचकित आहेत की, इतक्या दिवसानंतरही संक्रमित व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे कमी होत नाहीत. उलट इतर अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यामध्ये दिसू लागल्या आहेत. कोविडनंतरच्या रुग्णांमध्ये थकवा, सांधेदुखी, झोपेमध्ये अडचण, स्मृतीभ्रंश यासारख्या अनेक समस्या समोर येत आहेत. शास्त्रज्ञांनी या सर्व समस्यांना फायब्रोमायल्जिया  (fibromyalgia)  असे नाव दिले आहे. फायब्रोमायल्जिया ही एक जुनाट स्थिती बनली आहे, जी कोरोनामुळे संक्रमित झालेल्या लोकांमध्ये उद्भवते. एचटीच्या बातमीनुसार, कोविडमधून बरे झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात फायब्रोमायल्जियावर उपचार घेत आहेत. हे लोक स्नायू, अस्थिबंधन आणि हाडांच्या वेदनांनी त्रस्त आहेत. अनेकदा त्यांच्यामध्ये थकवा येतो आणि पोटाच्या समस्याही कायम राहतात. या सगळ्यामुळे, रुग्ण उदासीनता, चिंता आणि अस्वस्थ जीवन जगू लागतो.

विषाणूमुळे रक्तवाहिन्या खराब झाल्या
डॉक्टरांचे म्हणणे आहे की उपचार करणे देखील सोपे नाही, कारण आतापर्यंत त्यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. डॉक्टरांनी असेही सांगितले की, कोविड संसर्गानंतर अशा समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. जे लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत किंवा ऑक्सिजन थेरपी घेत आहेत किंवा ICU मध्ये दाखल होणार आहेत, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक गंभीर बनू शकते. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुडगाव येथील पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मनोज गोयल म्हणाले की, फायब्रोमायल्जिया आता पूर्णपणे समजला आहे. हा मस्कुलोस्केलेटल सिंड्रोम (musculoskeletal syndrome) आहे. कोविड संसर्गामुळे, विषाणूने रक्तवाहिन्या खराब केल्या आहेत, ज्यामुळे हे सर्व घडत आहे. तथापि, ते म्हणाले की फायब्रोमायल्जिया हा जीवघेणा आजार नाही. जीवनशैलीत बदल करून त्यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!