भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

1 जानेवारीपासून एटीएमची खिश्याला झळ ! एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली ,वृत्तसंस्था। येत्या 1 जानेवारीपासून बँक ग्राहकांना सेवांपोटी अधिक शुल्काचा फटका बसणार आहे. अनेक बँकांनी आर्थिक आणि गैरआर्थिक सेवा नियमांत बदल केले आहेत. हे बदल येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लागू होतील. पोस्ट खात्यातंर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकनेही एटीएम व्यवहार, बँक व्यवहार नियमांमध्ये बदल केला आहे. 1 जानेवारीपासून हे नवीन नियम लागू होतील. नवीन वर्षाचे स्वागत करतानाच खिश्याला झळ पोहचविणाऱ्या या नवीन नियमांबद्दल ग्राहकांनी जागरुक रहावे.

सर्वात अगोदर टपाल खात्याच्या पेमेंट बँकेविषयी जाणून घेऊयात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून (IPPB) सुरुवातीचे चार व्यवहारावर शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. तुम्हाला निःशुल्क रक्कम काढता येईल. मात्र त्यानंतर बचत खात्यातून अथवा एटीएममधून व्यवहार केल्यास शुल्क आकारणी करण्यात येईल. जितकी रक्कम काढणार आहात तिच्या 0.50 टक्के वा प्रति व्यवहार 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे.

व्यवहार केला तर शुल्क मोजा
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या सुविधेला कुठलाही आकार पडणार नाही. त्यासंबंधी चार्जेस द्यावे लागणार नाहीत. या नियमांत कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र बेसिक सेव्हिंग अकाऊंटच्या व्यतिरिक्त अन्यप्रकारचे बचत खाते असल्यास अथवा चालू खाते असल्यास अशा व्यवहारांवर प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत कुठलीही शुल्क आकारणी नाही. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला 0.50 टक्के वा कमीत-कमी 25 रुपेय प्रति व्यवहार शुल्क मोजावे लागेल. बेसिक अकाऊंट ऐवजी अन्य बचत खाते वा चालू खात्यात प्रति महिना 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत होतील. त्यानंतरच्या रक्कमेवरील व्यवहाराला 0.50 अथवा कमीतकमी 25 रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

CICI Bank ची शुल्कात वाढ
खासगी बँकांनीही व्यवहारावरील नियमांमध्ये आणि शुल्क आकारणीत बदल केला आहे. ICICI Bank ने सेवा शुल्कात वाढ केली आहे. बचत खात्यावर या नवीन नियमांचा थेट परिणाम 1 जानेवारी 2022 पासून दिसून येईल. 1 जानेवारीपासून एटीएम व्यवहारही सशुल्क होतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे. नवीन वर्षात या बँकेच्या एटीएममधून सुरुवातीच्या पाच व्यवहारावर कुठलेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. तुम्ही पाचवेळा रक्कम काढल्यास खिशाला झळ बसणार नाही. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी मात्र 21 रुपये मोजावे लागतील. 5 निःशुल्क व्यवहारानंतर सेवा सशुल्क होईल. आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येकी 21 रुपये तर इतर सेवांसाठी प्रति सेवा 8.50 रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल.

HDFC आणि AXIS Bank ने पण केले बदल
HDFC बँकेच्या ग्राहकांना एका महिन्यात 5 बँकिंग व्यवहार निःशुल्क असतील. हे नियम देशातील सर्व शहरांना लागू आहेत. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बंगळुरू आणि हैदराबाद या मेट्रो शहरातील एटीएममधून प्रत्येक महिन्याला केलेल्या पहिल्या 3 व्यवहाराला कुठलेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. या व्यवहारात आर्थिक अथवा इतर सेवांचा समावेश आहे. त्यानंतर HDFC बँकेच्या ग्राहकांना पुढील व्यवहारासाठी खिश्याला झळ बसेल. ठरवून दिलेल्या व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारापोटी ग्राहकाला 21 रुपये मोजावे लागतील. HDFC बँके व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएम धारकांना व्यवहारापोटी 8.5 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. AXIS Bank ने ही याच व्यावहारिक मार्गाचा अवलंब केला आहे. एक्सिस बँकेच्या कार्डधारकांना सुरुवातीचे पाच व्यवहार दरमहिन्यांला निःशुल्क आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारापोटी ग्राहकाला 20 रुपये मोजावे लागतील. तर इतर सेवांसाठी 10 रुपये भूर्दंड पडेल. 1 जानेवारी 2022 पासून हे नियम लागू असतील .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!