भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईम

बीअर किमतीचे फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड;सीसीआय ची कारवाई

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। भारताच्या स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मोठी कारवाई केली आहे. देशांतर्गत बीअरची विक्री आणि किमतीवर नियंत्रण ठेवून मनमानी किमतींमध्ये विक्री करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात युनायडेट ब्युअरीज, कार्ल्सबर्ग या बड्या कंपन्यांसह ११ कंपन्यांचा समावेश आहे.

सीसीआयने यापूर्वी बीअर कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा खुलासा केला होता. गेल्या ११ वर्षामध्ये या कंपन्या बीअरच्या किमती फिक्स करत होत्या. या कंपन्यांकडून एकत्र येऊन भारतीय बाजारात बिअरच्या किमती ठरविण्यात येत होत्या. त्यासाठी ऑल इंडिया ब्यूअर्स असोसिएशनतर्फे लॉबिंग करण्यात येत होते, असे सीसीआयने म्हटले आहे.

सीसीआने युनायटेड ब्युअरीज लिमिटेडवर सर्वाधिक ७५२ कोटी आणि कार्ल्सबर्ग इंडिया लिमिटेडवर १२१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर ब्युअर्स असोसिएशनला ६.५२ लाखांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांकडून २००९ ते २०१८ या कालावधीत बीअर किमतीचे फिक्सिंग करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोन बड्या कंपन्यांचा भारतातील बाजारपेठेत ८८ टक्के वाटा आहे.

मल्ल्याच्या कंपनीला सर्वाधिक दंड

बँकांची फसवणूक करून ब्रिटनला पळालेला आणि मद्यसम्राट म्हणून ओळखला जाणा-या विजय मल्ल्याची मालकी असलेल्या युनायटेड ब्युअरीजला सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!