देशभरात कोरोनाचा कहर,२४ तासात २,७१,२०२० कोरोना बाधित रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. शिवाय, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर सुरू आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे ओमायक्रॉन बाधितही आढळून येत आहे. देशात मागील २४ तासांत २ लाख ७१ हजार २०२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ३१४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
देशात मागील २४ तासांत २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची भर पडली आहे, तर ३१४ जणांचा कोरोनाने बळी गेला. १ लाख ३८ हजार ३३१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २ हजार ३६९ अधिक कोरोना केसेस वाढल्या आहेत. देशात १५ लाख ५० हजार ३७७ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ८ जानेवारीपासून १२ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे देशाच्या दैनंदिन कोरोना संसर्ग दरात दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग दर १६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९४.८३ टक्क्यांपर्यंत घसरला.देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १६.६६ टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात आतापर्यंत ७ हजार ७४३ ओमायक्रॉनबाधित आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७० कोटी २४ लाख ४८ हजार ८३८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १६ लाख ६५ हजार ४०४ तपासण्या शनिवारी करण्यात आल्या आहेत.