भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

मोदी यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक , नवे निर्बंध लागू होणार?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ४.३० वाजता ही बैठक घेणार आहेत. पंतप्रधान यावेळी संपूर्ण परिस्थिती आढावा घेणार आहेत. यादरम्यान काही महत्वाचे निर्णय देखील घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी महत्वाची बैठक बोलावली असून यामध्ये राज्यांना निर्बंधांबाबत नवे निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत नवे निर्बंध जारी केले असून १० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंद घातली असून लग्नावर देखील काही निर्बंध आहेत. आता मोदींच्या बैठकीनंतर राज्याला आणखी काय सूचना येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!