भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराजकीय

नरेंद्र मोदी किती वर्षे पंतप्रधानपदी राहणार? त्यांचे उत्तराधिकारी कोण? मोठी भविष्यवाणी 

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी दावा केला की, ग्रह-नक्षत्रांच्या हिशोबाने पाहिले तर १२ वर्षांपर्यंत पीएम मोदी देशाचे प्रमुख राहतील. राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रदानपदाचा त्याग करतील आणि योग्य व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवतील. तसेच योगी आदित्यनाथ हे मोदींचे उत्तराधिकारी असतील, असा दावाही त्यांनी केला.

महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी भविष्यवाणी केली की, मोदीजी १२ वर्षांच्या शासनकाळानंतर स्वत:च पंतप्रधानपदाचा त्याग करतील. तसेच राष्ट्रवादाच्या नावाने जी व्यक्ती देशाला चांगल्या पद्धतीने चालवण्यात सक्षम असेल, त्या व्यक्तीकडे देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपवतील. तसेच ते राजकारणाचा त्याग करून एक आदर्श प्रस्थापित करतील.

महोबामध्ये स्वजन शिष्य संमेलन कार्यक्रमादरम्यान, त्यांनी पुढे सांगितले की, आमचा आशीर्वाद आहे की, मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीची सत्ता सांभाळावी. त्यांनी पंतप्रधान बनून हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पूर्ण करावे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा इतिहास रचला आहे. तसेच राजकीय वर्तुळामध्ये त्यांना भाजपाचे भविष्यातील पीएम मटेरियल म्हणून पाहिले जात आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!