पंजाबमध्ये आता सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी भगत सिंग आणि आंबेडकर यांचे फोटो लावले जातील -मान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। विधान सभेच्या जाहीर होत असलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येणार असे स्पस्ट झाले आहे .पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी त्यांची भविष्यातील रणनिती निकालाआधीच जाहीर केली आहे.
दरम्यान, पंजाबचे भावी मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीशी बोलताना भगवंत मान म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी भगत सिंग आणि बाबसाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील. भगत सिंग यांनी देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले. तर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. पंजाबमध्ये १० मार्चपासून एक नवी सुरूवात होणार आहे. गेल्यावेळी आम्ही चुका केल्या होत्या हे आम्ही मान्य करतो. पण त्या चुकांपासून आम्ही शिकलो. पण यावेळी झाडू ७० वर्षाची घाण साफ करेल. आम्ही पंजाबमध्ये खुप प्रचार केला. आमच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या खिशातील पैसे खर्चकरून प्रचार केला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो.