भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे “या” देशात लॉकडाऊन जाहीर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। अनेक देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नेदरलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

लॉकडाऊन दरम्यान फक्त वैद्यकीय, व्यवसाय, सुपरमार्केट आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. इतर सर्व दुकाने, शिक्षणसंस्था, हॉटेल्स, संग्रहालय, चित्रपटगृह आणि प्राणी संग्रहायलय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या भीतीने डच सरकारने देशात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाउन जाहिर करतांना नेदरलँडचे पंतप्रधान रुट्टे यांनी सांगितले, की नेदरलँड्समध्ये पुन्हा लॉकडाउनमध्ये लावावा लागतोय याचे मला दुःख आहे.

हा लॉकडाऊन १४ जानेवारी २०२२ पर्यंत लागू असेल. ओमायक्रॉनमुळे देशाला कोरोनाच्या पाचव्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. ख्रिसमसनंतर नेदरलँडमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढेल, असा दावा तिथल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!